

सकाळ एक्सक्ल्युझिव्ह
----------
रिक्षाचा फोटो वापरावा.
---
सोलापुरात दोन ते पाच रुपयांनी रिक्षाचा प्रवास महागणार!
आरटीएची बैठक; आज जिल्हाधिकारी जाहीर करणार नवे दर
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : सोलापूर शहरात रिक्षांतून प्रवास करताना पहिल्या दीड किलोमीटरकरिता २३ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १५ रुपये भाडे द्यावे लागते. त्यात आता २ ते ५ रुपयांची वाढ होणार असून, नव्या दरांची घोषणा उद्या (सोमवारी) जिल्हाधिकारी करणार आहेत. महापालिका क्षेत्रात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत प्रवाशांना २५ टक्के तर ग्रामीण भागात ४० टक्के अतिरिक्त भाडे लागू राहणार आहे.
सोलापूर शहरातील रस्त्यांवर सध्या ३० हजारांवर रिक्षा धावतात. २०१२ नंतर थेट जुलै २०२२ मध्येच रिक्षाचे प्रवास भाडे वाढले होते. सोलापूरच्या तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या कार्यकाळात रिक्षाचे प्रवास भाडे वाढले. त्यानंतर आता चार वर्षांनंतर रिक्षाचा प्रवास महागणार आहे. सीएनजी, एलपीजी गॅस, पेट्रोल-डिझलचे दर वाढले आहेत. यामुळे रिक्षा चालक संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी पोलिस उपायुक्त वृष्टी जैन, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत रिक्षा चालकांच्या मागणीनुसार भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. पण, भाडेवाढीच्या प्रस्तावात काही त्रुटी होत्या, त्या दुरुस्त करून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ‘आरटीओ’ला दिल्या. त्यानुसार आता सोमवारी त्यावर अंतिम निर्णय होईल आणि जिल्हाधिकारी त्याच दिवशी रिक्षांच्या नव्या प्रवास भाड्यांची घोषणा करतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
---
कोट
PNE26W51505
मागील चार वर्षांत इंधनाचे दर खूप वाढले आहेत. पूर्वीच्या भाड्यात रिक्षा चालविणे परवडत नाही. त्यामुळे रिक्षा प्रवास भाड्यात वाढ करावी, अशी आम्ही चार महिन्यांपासून मागणी करीत आहोत. पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पाच रुपयांची वाढ व्हावी, अशी आमची मागणी आहे.
- तानाजी मसलकर, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत रिक्षा संघटना, सोलापूर
---
चौकट
रिक्षांना मीटरची असणार सक्ती
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) रिक्षाचे प्रवास भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. भाडेवाढीची अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्व रिक्षांना मीटर बसवावे लागेल. मीटरच्या रीडिंगप्रमाणेच प्रवाशांकडून रिक्षा चालकांना भाडे घेण्याची अट त्यांच्यासाठी लागू असणार आहे. ज्या रिक्षांना मीटर नाही, त्यांच्यासाठी काही दिवसांची मुदत राहील, मात्र मीटर नसताना वाढीव भाडे घेता येणार नाही.
---
सोलापुरातील रिक्षा अन् सध्याचे भाडे
अंदाजे एकूण रिक्षा
३०,०००
पहिल्या दीड किमीचे भाडे
२३ रुपये
पुढील प्रत्येक किमीचे भाडे
१५ रुपये
रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत भाडे
२५ टक्के अतिरिक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.