पुणे - गेल्या काही वर्षापासून सौर ऊर्जेच्या वापरासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरु असून, त्यासाठी अनुदानही दिले जाते. त्यामुळे पुणे शहरात सौर ऊर्जेचा वापर दुपटीने वाढला असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद केले आहे..२०२४-२५ मध्ये १ लाख ६६ हजार ५१२ किलोवॅट ऊर्जा सौरऊर्जेच्या माध्यमातून वापरली गेली आहे. २०२३-२२४ मध्ये हा वापर ७९ हजार ६१८ किलोवॅट इतका होता. एका वर्षात ५० हजार ९७ किलोवॅट क्षमतेची सोलर पॅनेल बसविण्यात आली आहे. एकूण वापरापैकी ६१ टक्के वापर हा घरगुती कारणासाठी होत आहे..महापालिकेचा पर्यावरण अहवाल आज (ता. २९) विशेष सर्वसाधारण विशेष सभेत उपायुक्त संतोष वारुळे यांनी पर्यावरण अहवाल सादर केला. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत हा अहवाल पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित हा अहवाल आहे.आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखापाल उल्का कळसकर, उपायुक्त संदीप कदम, मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते..पुण्यातील नागरिक टेकड्यांच्या संवर्धनासाठी जागरूक आहेत. टेकड्यांवरील वृक्षतोड रोखणे, तेथे अतिक्रमण होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात. वेळप्रसंगी आंदोलनेही होतात. त्यामुळे या टेकड्यांवरील पशुपक्षांनाही पोषक वातावरण निर्माण झाले आहे.वेताळ टेकडी, कवडीपाठ आणि पाषाण या भागांतील पक्षी निरीक्षणानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वेताळ टेकडीवर २७५, कवडीपाठ येथे २६४ आणि पाषाण येथे २४० पक्ष्यांची नोंद झाली आहे..दोन लाख झाडांची वाढ२०२३-२४ मध्ये पुण्यात २११ उद्याने व ५५.८१ लाख झाडे होती. २०२४-२५ मध्ये २२४ उद्याने आणि ५७.८१ लाख झाडांची नोंद झाली. उरुळी देवाची व फुरसुंगी ही गावे महापालिकेच्या हद्दीबाहेर गेल्याने क्षेत्रफळ ५१९ चौरस किलोमीटरवरून ४८० चौरस किलोमीटर झाले असले, तरी झाडांची संख्या वाढली..सौर ऊर्जेचा वापर – दुप्पट वाढ२०२३–२४: ७९,६१८ किलोवॅट२०२४–२५: १,६६,५१२ किलोवॅटवाढ: सुमारे १०६ टक्केझाडांची संख्या वाढली२०२३–२४: ५५.८१ लाख२०२४–२५: ५७.८१ लाखवाढ: २ लाख झाडेविश्लेषण: महापालिकेच्या हद्दीतून उरुळी देवाची व फुरसुंगी वगळल्याने क्षेत्रफळ कमी झाले तरी झाडांची संख्या वाढली आहे. हे निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे..उद्यानांची संख्या२०२३–२४: २११२०२४–२५: २२४विश्लेषण: शहरातील हरितक्षेत्र वाढत असल्याने शहरी पर्यावरण सुधारते आणि नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध होतात.पक्षी विविधता – स्थळांनुसार लक्षणीय वाढठिकाण -२०२३–२४ -२०२४–२५- वाढवेताळ टेकडी -२५३ - २७५ - २२कवडीपाठ - २६३- २६४ -१पाषाण - २३६ - २४० -४.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.