खडकवासला : वाहतूक नियोजनासाठी हवेली पोलीसांचा चोख बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solution on traffic jam security of haveli police for traffic planning pune

खडकवासला : वाहतूक नियोजनासाठी हवेली पोलीसांचा चोख बंदोबस्त

किरकटवाडी : मागील काही दिवसांपासून दर रविवारी वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या स्थानिक नागरिक व पर्यटकांना या रविवारी मात्र दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरण चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हवेली पोलीसांनी एकेरी वाहतूक करुन जागोजागी पोलीस कर्मचारी तैनात केल्याने वाहनांची संख्या जास्त असतानाही या रविवारी वाहतूक कोंडी न झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त करत पोलीसांचे आभार मानले आहेत.

मागील काही आठवड्यांत दर रविवारी खडकवासला धरण चौकात मोठी वाहतूक कोंडी होत होती. तब्बल तीन ते चार तास स्थानिक नागरिक व पर्यटक या वाहतूक कोंडीत अडकून पडायचे. काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरण चौपाटी, सिंहगड किल्ला, पानशेत व वरसगाव धरण या परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने दर रविवारी वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालली होती. याचा विचार करून या रविवारसाठी हवेली पोलीसांनी खडकवासला गावातून एकेरी वाहतूकीचे नियोजन केले होते व बेशिस्त वाहनचालकांना आवर घालण्यासाठी जागोजागी पोलीस कर्मचारी तैनात केले होते. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

"दर रविवारी खडकवासला येथे वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या आम्ही पाहत होतो. आज मात्र असे काही जाणवले नाही. जाताना व येताना दोन्ही वेळी पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करताना दिसले."

-भावना बाफना, पर्यटक

"जर पोलीस कर्मचारी नसते तर आमचे दोन-तीन तास वाहतूक कोंडीत गेले असते. यापुढेही असेच नियोजन असावे. विशेष म्हणजे नागरिकही पोलीसांना सहकार्य करताना दिसत होते." -गौतम ओसवाल, पर्यटक

"खडकवासला धरण चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूकीचे नियोजन केले होते. पुण्याकडे जाणारी वाहतूक खडकवासला गावातून तर सिंहगड,पानशेतकडे जाणारी वाहतूक खडकवासला बाह्यवळण रस्त्यावरुन वळविण्यात आली होती. याचा चांगला परिणाम आज दिसून आला. सर्व पोलीस कर्मचारीही नेमून दिलेल्या ठिकाणी थांबून होते."

- निरंजन रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे.

Web Title: Solution On Traffic Jam Security Of Haveli Police For Traffic Planning Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..