

Someshwar Sugar Factory Sugarcane Rate 2026 First Installment of 3951 Per Ton Announced for Farmers in Pune District Maharashtra
esakal
वडगाव निंबाळकर: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर देण्याची परंपरा कायम राखत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रतिमेट्रिक टन ३,९५१ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये हा सर्वाधिक पहिला हप्ता असून कारखान्याच्या इतिहासातीलही ही विक्रमी उचल ठरली आहे. त्यामुळे पहिल्या उचलीच्या बाबतीत सोमेश्वरने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.