Someshwar Sugar Factory Election Result 2026 : 'सोमेश्वर'च्या मतमोजणीत पहिला निकाल सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने; संग्राम सोरटे 57 मतांनी विजयी, समर्थकांचा जल्लोष

Someshwar Sugar Factory Election 2026 First Result Declared : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पहिल्या निकालात अजितदादा पवार पॅनलचे संग्राम सोरटे विजयी झाले. त्यांनी महेश राणे यांचा ५७ मतांनी पराभव केला.
Someshwar sugar factory election result 2026

Someshwar sugar factory election result 2026

esakal

Updated on: 

वडगाव निंबाळकर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजल्यापासून मतपत्रिकांच्या चिठ्ठ्या एकत्र करण्याचे काम सुरू (Sangram Sorte election victory news) होते. त्यानंतर हाती आलेल्या सोसायटी गटाच्या पहिल्या निकालात श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलचे उमेदवार संग्राम तानाजी सोरटे यांनी विजय मिळविला. त्यांनी लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलचे उमेदवार महेश महादेव राणे यांचा ५७ मतांनी पराभव केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com