

Baramati News Someshwar Sugar Factory Election Sees Slow Voting as Voters Spend More Time Stamping Ballot Papers at Sastewadi
esakal
चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला संथ गतीचा फटका बसत आहे. बॅलेट पेपरवर प्रत्येक उमेदवारासमोर शिक्के मारून मतदान करावे लागत असल्याने मतदारांचा अधिक वेळ जात आहे. त्यातच काही मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या जास्त असल्याने लांब रांगा लागत असून, मतदानासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.