सोमेश्वरनगर - येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पास 'कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया'च्या वतीने देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा 'बेस्ट कोजनरेशन पॉवर प्लांट' हा पुरस्कार जाहिर झाला आहे. सदर प्रकल्पाव्दारे सलग तीन वर्ष शंभर टक्के क्षमतेने सहवीजनिर्मिती केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे सहकारी व खासगी अशा दोन्हींमधून 'सोमेश्वर' सर्वोत्कृष्ट ठरला आहे.