
Sweet to Sour: Ethanol Policy U-turn Sours Diwali for Sugar Mills
Sakal
सोमेश्वरनगर : एकीकडे केंद्र सरकार पर्यावरणपूरक इथेनॉलचे उत्पादन वाढवा, असा धोशा लावते. मात्र, दुसरीकडे निर्णयात धरसोड करत असल्याने साखर उद्योगात अस्वस्थता आहे. डिस्टिलरी उद्योगांनी तेल विपणन कंपन्यांना तब्बल १७७६ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे प्रस्ताव दिले होते. त्यापैकी केवळ १०४८ कोटी लिटर कोटा मंजूर केला आहे. त्यातही रसापासून आणि बी हेवीपासून इथेनॉलनिर्मितीवर तर संक्रांत आणली आहे. त्यामुळे भविष्यात आपले ‘दिवाळे’ वाजू नये अशी चिंता ऐन दिवाळीत साखर कारखानदारांना सतावू लागली आहे.