पुणे : धक्कादायक ! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घृण हत्या | Pune crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder
पुणे : धक्कादायक ! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घृण हत्या

पुणे : धक्कादायक ! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घृण हत्या

पुणे : येथील राजगुरुनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मुलानेच ८० वर्षीय पित्याची चाकूने वार करुन निघृण हत्या (son killed father) केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शंकर रामभाऊ बोरहाडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर शेखर बोरहाडे (47) असं आरोपीचं नाव आहे. शेखरने पित्याची हत्या केल्यानंतर राजगुरु पोलीस स्टेशनमध्ये (Rajguru police station) जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. (son brutally killed his father after knowing his fathers intention of remarriage)

हेही वाचा: Assembly Elections 2022 : सभा, रॅली, पदयात्रांवर 15 जानेवारीपर्यंत बंदी

"पित्याने पुन्हा लग्न करण्यासाठी मॅट्रीमोनिअलवर नोंदणी केली असल्याचं मला माहित झालं. त्यानंतर रागाच्या भरात मी माझ्या पित्याची हत्या केली", असा कबुली जबाब आरोपी शेखरने पोलिसांना दिला. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

शेखर बोरहाडे हा राजगुरुनगरमधील नंदादीप सोसायटीतील रहिवाशी आहे. "माझ्या वडिलांनी त्यांच्या पत्नीसह मॅट्रीमोनिअल ब्युरोमध्ये नोंदणी केली होती त्यासाठी त्यांनी ब्युरोमध्ये पैसेही दिले होते. त्यानंतर माझ्या वडिलांना दुसरं लग्न करायचं होतं याबाबत मला कळलं. त्यानंतर मला प्रचंड राग आला आणि मी माझ्या वडिलांची हत्या केली", असं आरोपी शेखरने पोलिसांना सांगितलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrime
loading image
go to top