खडकवासला कालव्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाचा बुडून मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

son help mother after father death Khadakwasla canal drowning death Kirkatwadi

खडकवासला कालव्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाचा बुडून मृत्यु

किरकटवाडी : दोन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी खडकवासला कालव्यात गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडालेल्या मयुर बापु मरगळे (वय 13, रा गल्ली नं 8, शिवनगर किरकटवाडी) याचा आज शिंदेवस्ती, हडपसर येथे कालव्यात मृतदेह आढळून आला आहे. मनमिळावू व कष्टाळू मयूर अचानक गेल्याने मरगळे कुटुंबासह खडकवासला व किरकटवाडी परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

पाच वर्षांपूर्वी मयुर अवघा आठ वर्षांचा असताना त्याच्या वडीलांचे अपघाती निधन झाले होते. कोवळ्या वयात परिस्थिने अंगात समजूतदारपणा आलेल्या मयुरने तेव्हापासूनच आई व आजोबांना मदत व्हावी म्हणून सकाळी लवकर उठून पेपर टाकण्याचे काम सुरू केले. तसेच आजोबांना पिठाच्या गिरणीवरही मयुर मदत करत होता. काम करुन तो शिकत होता व अभ्यासातही हुशार होता. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मयुरचे शाळेतील वर्तनही अत्यंत नम्रतेचे होते. मयुरच्या स्वभावगुणांमुळे गल्लीतील रहिवासीही त्याचे कौतुक करत असायचे.

दि. 13 जून रोजी तो पोहण्यासाठी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला सुमारे पाचशे मीटर अंतरावर कालव्यात उतरला. सोबत त्याचा लहान भाऊ व आणखी एक मित्र होता. पोहता येत नसल्याने व पाण्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणात मयुर दिसेनासा झाला. घाबरलेल्या मित्राने मयुरच्या आजोबांना याबाबत माहिती दिल्यानंतर आजोबांनी रडत रडत हवेली पोलीस ठाणे गाठले. दोन दिवस अग्निशमन दलाचे जवान व हवेली पोलीसांनी शोध घेतला परंतु मयुर सापडला नाही. आज अखेर हडपसर जवळील शिंदेवस्ती येथे मयुरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात मयुरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाला सावरण्यासाठी धडपडणाऱ्या कोवळ्या मयुरचे अकाली जाणे सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले.

Web Title: Son Help Mother After Father Death Khadakwasla Canal Drowning Death Kirkatwadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top