

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ६ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) निवडणुकांमधील विजयाचा दर यापूर्वीचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्या कार्यकाळातील विजयाच्या दरापेक्षा कमी आहे, असा दावा भाजपने केला आहे. तसेच सोनिया गांधी भाजपसाठी ‘मतचोरी’ करत होत्या का?, असा उपरोधिक सवाल त्यांनी काँग्रेसला केला आहे.
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘मतचोरी’च्या आरोपांची खिल्ली उडविली आणि ‘राहुल गांधी यांच्या तर्कानुसार सोनिया गांधी भाजपसाठी मतचोरी करत होत्या का?’ असा उपरोधिक सवाल केला. ‘एक्स’ या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे भंडारी यांनी म्हटले, की संपत यांची काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५ या काळात पदभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या निवडणुकांपैकी सुमारे ७५ टक्के निवडणुकांमध्ये ‘एनडीए’ने विजय मिळविला होता. ज्ञानेशकुमार यांच्या कार्यकाळात ‘एनडीए’चा विजयाचा दर सुमारे ६६ टक्के आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग भाजपला अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप राहुल गांधी करीत आहेत. मात्र, निवडणुकांमधील विजयाची आकडेवारी त्यांच्या ‘मतचोरी’च्या आरोपांचे खंडन करते, असा दावा त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.