

Sonul Kotwal a farmer’s son, tops MPSC
Sakal
घोडेगाव : कोतवाल यांनी दिव्यांग प्रवर्गातून (लोकोमोटर आणि इतर अपंगत्व) राज्यात प्रथम क्रमांक पटकावून ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. सोनुल कोतवाल सध्या घोडेगाव ( ता आंबेगाव)येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आईवडिलांचा व्यवसाय शेती असून, ते प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब गणपत कोतवाल यांचे सुपुत्र आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवक आपल्या मेहनतीच्या, चिकाटीच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर राज्यसेवेत सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे.