esakal | निश्चयाचा महामेरु - शंतनू भडकमकर

बोलून बातमी शोधा

Shantanu Bhadkamkar
निश्चयाचा महामेरु - शंतनू भडकमकर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ज्याप्रमाणे नदी उगमस्थानी लहान असते, त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय संचालक म्हणून शंतनू भडकमकर काम पाहत असलेली क्लिअरिंग अँड शिपिंग (एटीसी) प्रा. लि. ही कंपनी प्रारंभी लहान स्वरूपातच होती. नदीचे पात्र रुंदावत जाते, तिचा प्रवाह आणि प्रवास मोठा होत जातो, तसतसे महत्त्वही समाजाला कळत जाते. आपल्या ‘एटीसी’ कंपनीचेही तसेच आहे. आज या कंपनीला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. कंपनीच्या विकासाला, वाढीला मानवी कष्टांची व सदगुणांची, मूल्यनिष्ठ जीवनदृष्टीची जोड असते. म्हणून कंपनीच्या नेतृत्वाचा, दूरदृष्टीचा, व्यावहारिक दृष्टिकोनाचा, रात्रंदिवस घेतलेल्या ध्यासाचा मोठा वाटा असतो.

कंपनीचे अनेक देशांशी व्यवहार सुरू झाले. ११ नोव्हेंबर १९५७ रोजी ‘एटीसी’ची भागीदारी नोंदवली गेली. १९७२ मध्ये ‘एटीसी’ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. ‘एटीसी’च्या पुढे क्लिअरिंग आणि शिपिंग असा उल्लेख केला जाऊ लागला. विविध कंपन्यांचा माल परदेशातून आपल्या देशात येत असे आणि आपल्या देशातून अन्य देशात पाठवला जात असे. यात अनेक पार्सल, त्याचप्रमाणे अवजड यंत्रसामग्रीही असे. आजकालच्या जेटयुगात प्रत्येक ग्राहकाला जलद व उत्तम सेवा हवी असते.

हेही वाचा: कोरोनामुळे ‘बाटली’ आडवी; पुणे जिल्ह्यातील 25 टक्के परमिट बार कायमचे बंद

श्रीराम मोरेश्वर भडकमकर, मो. रा. मोघे, भा. मो. बहुतुले या संस्थापक त्रयींनी ११ नोव्हेंबर १९५७ मध्ये एटीसी या क्लिअरिंग ॲण्ड शिपिंग कंपनीची मुहूर्तमेढ रचली. सध्या शंतनू भडकमकर, मिहीर भडकमकर, मकरंद मोघे व आशुतोष साठे हे पुढच्या पिढीतील भागी सातासमुद्रापार पसरलेला व्याप सांभाळण्यात मग्न आहेत. ‘एटीसी कंपनी’ आता ‘एटीसी ग्लोबल लॉजिस्टिका’ या नावाने ओळखली जाते. अनेक देशांतील कार्यालयांशी संवाद साधणे आणि कामाचा ओघ अविरत चालू ठेवणे हे कार्य उत्तम नेतृत्वाशिवाय घडू शकत नाही. नवीन व जुन्या ग्राहकवर्गात विश्वासाचे नाते संबंध निर्माण करणे हे कुशल संवादकर्त्यांचे कार्य आहे. हे सर्व कार्य आत्मविश्वासाने, सातत्याने, उत्साहाने शंतनू भडकमकर करीत आहेत.

कंपनीच्या इतिहासात अनेकदा संकटे, अडचणी येतात. अनपेक्षितपणे काही घटना घडतात, जोखीम पत्करावी लागते. त्यासाठी लागणारे धैर्य, धीरोदत्तपणा शंतनू भडकमकर यांच्याकडे आहे. शांतपणाने संवाद साधणे, आश्वासक संपर्क प्रस्थापित करणे, ग्राहकांना महत्त्व देणे, गरजा ओळखून समाधान करणे याचे कौशल्य कंपनीच्या विस्तारास उपयुक्त ठरणारी शंतनू भडकमकर यांची गुणसंपदा आहे. आज त्यांची षष्ट्यब्दीपूर्ती. त्यानिमित्त त्यांना अनंत शुभेच्छा !