पोलिस अधीक्षक पोहचले थेट गृहमंत्र्यांच्या गावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sp abhinav deshmukh

पोलिस अधीक्षक पोहचले थेट गृहमंत्र्यांच्या गावी

मंचर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर (ता. आंबेगाव) गावाला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवार (ता. १७) संायकाळी अचानक भेट दिली. गावकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कोरोना रोखण्यासाठी पोलिस खात्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली. गावकऱ्या बरोबर संवाद साधला. कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बधांची अंमलबजावणी करण्याविषयी डॉ. देशमुख यांनी सूचित केले. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज देशमुख, माजी उपसरपंच शांताराम गावडे, रवींद्र वळसे पाटील, मिलिंद वळसे पाटील, डॉ. अतुल साबळे, संतोष वळसे पाटील उपस्थित होते.

हेही वाचा: जुन्नर : ट्रॅक्टर अपघातात वडील-मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जुकोरोनाबाधित उपचार घेत असलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या तसेच वयोगट, गाव पातळीवर राबविलेल्या उपाययोजना, पोलिसांचे कामकाज व पोलीस खात्याविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया डॉ. देशमुख यांनी समजून घेतल्या. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनची गरज, महत्व, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क वापर याबाबत जनजागृती करा. कोणतीही अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधा. तुम्हाला मदत मिळेल असे डॉ. देशमुख यांनी संगितले.

हेही वाचा: धक्कादायक! नारायणगावात होम क्वारंटाइन रुग्ण फिरताहेत मोकाट

दरम्यान मंचर, पिंपळगाव, निरगुडसर, अवसरी या गावांना डॉ. देशमुख यांनी भेट दिली. समवेत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते आणि पोलिस निरिक्षक सुधाकर कोरे उपस्थित होते.