
पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा या अंतराळ संशोधन संस्थांना भेटी देण्याची संधी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने तीन टप्प्यांत चाचणी परीक्षा घेण्याचे निश्चित केले. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेला १६ हजार १२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी तब्बल १३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.