मिळणार, सत्ता मिळणार पण... | Election Results 2019

मृणालिनी नानिवडेकर 
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

बाहेरच्या पक्षातले आमदार, खासदार आपल्याकडे घेण्याचा चंग भाजपने बांधला आणि त्यामुळेच निकालांनी भाजपला काहीसा फटका दिला. भाजप आज पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष ठरला तर आहे; पण, गेल्या वेळेपेक्षाही कमी जागा जिंकून. 

शेटजी भटजींचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात गेल्यावेळी 123 जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष झाला तेव्हा ते मोदींच्या त्सुनामीचे फळ मानले जात होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यश मिळू लागले तेव्हा भाजप महाराष्ट्राचा प्रमुख राजकीय पक्ष ठरल्याचे राजकीय निरीक्षक मानू लागले. भाजपची भूक मोठी असल्याने त्यांना चतकोराने सुख मिळत नव्हते. बाहेरच्या पक्षातले आमदार, खासदार आपल्याकडे घेण्याचा चंग भाजपने बांधला आणि त्यामुळेच निकालांनी भाजपला काहीसा फटका दिला. भाजप आज पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष ठरला तर आहे; पण, गेल्या वेळेपेक्षाही कमी जागा जिंकून. 

कोथरूड : कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांचा विजय पण लीड एवढंच... | Election Results 2019

कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय, सत्तेत त्यांना न मिळालेला वाटा आणि "पार्टी विथ डिफरन्स' या बिरुदावलीशी घेतलेली फारकत ही यामागची कारणे असावीत. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाने दिग्गजांना उमेदवारी नाकारली. जनता आपल्याला स्वीकारेल याचा आत्मविश्‍वास बाळगला पण तो काहीसा फाजील होता, हे निकालांनी दाखवून दिले आहे.

महाराष्ट्रात भाजपला दिवाणखान्यातून बाहेर नेत जनमानसात रुजवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येलाही या निकालांनी पराभवाची चव चाखायला लावली आहे. त्याशिवाय एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी यांनाही पराभूत व्हावे लागले. भाजपची अजस्र निवडणूक यंत्रणा आणि प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणारे पन्नाप्रमुख लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी दिसत होते; पण विधानसभेत मात्र ते दिसलेच नाहीत. पक्ष प्रचंड आत्मविश्‍वासात वावरत असताना जमिनीशी संपर्क ठेवू शकला नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

हडपसर : भाजपला पहिला धक्का; राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी | Election Results 2019

पक्षासमोर सत्ता मिळणार असली तरी, मोठी आव्हाने उभी झाली आहेत. बंडखोरांना बरोबर घेऊन भाजप नवे सरकार निश्‍चित स्थापन करेल; पण पक्षविस्तार आणि पक्षसंघटनेसमोरची आव्हाने मात्र या निकालाने अधिकच व्यापक केली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Article on BJP victory in Maharashtra Vidhansabha 2019