पुण्यात लसीकरण बंद; राज्य सरकारकडून लशीचा पुरवठा नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

राज्य सरकारकडून लशीचा पुरवठा न झाल्याने शुक्रवारी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

पुण्यात लसीकरण बंद; राज्य सरकारकडून लशीचा पुरवठा नाही

sakal_logo
By
सूरज यादव

पुणे - पुण्यात (Pune) कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजुला कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Covid 19 vaccination) मोहिमेत मात्र सातत्यानं अडथळा येत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा पुण्यातील लसीकरण बंद राहणार आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) लशीचा पुरवठा न झाल्याने शुक्रवारी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यामुळे दोन दिवस सुरू असलेले लसीकरण पुन्हा बंद राहणार आहे. (covid 19 vaccination stopped on friday due to no vaccine supply from state)

हेही वाचा: पुण्यातील ‘खेडेकर’मध्येही होणार आता बुरशीवर उपचार

गेल्या आठवड्यातही महापालिकेला लसीचा पुरवठा होऊ शकला नव्हता. त्यामुळे सुमारे तीन दिवस लसीकरण बंद ठेवावे लागले होते. मंगळवारी रात्री राज्य सरकारकडून केवळ साडेसात हजार लसींचा पुरवठा महापालिकेला करण्यात आला. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवार या दोन दिवस लसीकरण होऊ शकले. त्यामुळे पुन्हा लसीचा पुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, राज्य सरकारकडून महापालिकेला गुरुवारी लस उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे शुक्रवारी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. दरम्यान, बुधवारी शिल्लक राहिलेल्या डोसमधून गुरुवारी दिवसभर लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी (ता.२०) आठवड्यात दुसऱ्यांदा तीन आकडी झाली आहे. शहरात ९३१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याआधी सोमवारी (१७ मे) ६८४ नवे रुग्ण आढळून आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत फक्त दोन वेळाच नवीन रुग्णांची आकडेवारी एक हजारांच्या आत आली आहे.

loading image
go to top