पुण्याच्या बाजारपेठेत येणार पंचवीस कोटी; केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी विशेष पॅकेज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

पुण्यात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील हजारो अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. प्रीपेड रूपे कार्डच्या रूपात हे कर्ज मिळणार आहे. हे पैसे 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करायचे आहे.

पुणे - केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या "स्पेशल फेस्टिव्हल ऍडव्हान्स स्कीम'द्वारे दहा हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार असल्याने पुण्याच्या बाजारपेठेची उलाढाल सुमारे पंचवीस कोटींनी वाढणार आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे ठप्प झालेल्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सणासाठी दहा हजार रुपयांचा "ऍडव्हास' देण्याची घोषणा केली आहे. सर्व केंद्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याने हा पैसा थेट बाजारात येणार आहेत. पुण्यात केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील हजारो अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. प्रीपेड रूपे कार्डच्या रूपात हे कर्ज मिळणार आहे. हे पैसे 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करायचे आहे. खरेदीसाठीच त्याचा उपयोग होणार असल्याने बाजारपेठेला त्यातून चालना मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्याची रक्कमही (एलटीसी) कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याने बाजारातील उलाढाल वाढणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील केंद्रीय जीएसटी विभागातील अधिकारी संजय गोखले म्हणाले, "कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सणासुदीसाठी दहा हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या हातात येतील, ही चांगली बाब आहे. यामुळे बाजारात पैसा येईल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हे पैसे कर्जरूपाने मिळणार असले तरी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. वस्तू "इएमआय'ने घेण्यापेक्षा या पैशातून खरेदी करणे सोपे जाईल. याहीपेक्षा बाजारपेठेला यातून चांगला बूस्ट मिळेल. 
- डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक, मध्य रेल्वे 

केंद्र सरकारने बाजाराला उठाव मिळावा म्हणून स्पेशल फेस्टिव्हल पॅकेज जाहीर केले आहे, त्याचा कर्मचाऱ्यांना लाभ होईल; परंतु त्याऐवजी जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा गोठविण्यात आलेला महागाई भत्ता (डीए) दिला असता तर आमचे पैसे आम्हाला मिळाले असते. हे पॅकेज जुनीच योजना असून, शेवटी कर्जच आहे. त्याऐवजी केंद्र सरकारने आमची हक्‍काची महागाई भत्त्याची रक्‍कम द्यावी. 
- डी. के. धुमाळ, मंडल सहसचिव, नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज (महाराष्ट्र सर्कल) 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते; मात्र खासगी व्यवसायांना कोरोनाची मोठी झळ बसली आहे. अशा काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा हा भत्ता बाजारपेठेला चालना देण्यास मदत करेल. 
- फत्तेचंद रांका, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष 

पुण्यातील केंद्रीय कर्मचारी सुमारे 25 हजार 
..... 
पुण्यातील केंद्रीय खाती 
रेल्वे, टपाल, टेलिफोन, केंद्रीय जीएसटी, प्राप्तिकर, संरक्षण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special package for employees from Central Government