'स्वच्छ हात' हीच आजारांविरुद्धची ढाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

संसर्गजन्य आजारांचा प्रसार टाळण्यासाठी वेळोवेळी हात धुण्याची ही सवय निश्‍चितच महत्त्वपूर्ण आहे. आज जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा..

पुणे - कोरोनामुळे सातत्याने हात धुण्याची सवय तुम्ही अंगीकारली आहे का? संसर्गजन्य आजारांचा प्रसार टाळण्यासाठी वेळोवेळी हात धुण्याची ही सवय निश्‍चितच महत्त्वपूर्ण आहे. आज जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा...  

हात धुण्याचे महत्त्व
स्पर्शाची बहुतेक कामे हातांद्वारे होतात. त्यामुळे जिवाणू आणि विषाणू आदी सूक्ष्मजीवांच्या प्रसाराचे हात एक प्रमुख माध्यम आहे. 
संसर्गजन्य आजारांसह सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सातत्याने हात धुणे गरजेचे आहे.
अतिसार, विषमज्वर, विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी हात धुणे महत्त्वाचे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हात न धुण्याचे परिणाम
कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार वाढेल
लहान मुलांमध्ये अतिसार, पोटाशी निगडित आजारांचा प्रसार वाढेल.
कुटुंबात आनारोग्य नांदेल 

असे धुवा हात 
हात धुवायला किमान २० सेकंद तरी द्यावे. हे २० सेकंद आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात.
सर्वात आधी हात ओले करा. पाणी कोमट असल्यास अधिक उत्तम 
साबण किंवा लिक्विड हॅंडवॉश हाताला लावा
आता दोन्ही हात चोळत फेस तयार करा आणि २० सेकंदांपर्यंत हात एकमेकांवर चोळा. 
हाताची बोटे, मनगट, तळवा, पार्श्‍वभाग आदी भागाला व्यवस्थित साबण रगडा.
हात पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेल वापरा. सुती कपडा सर्वात योग्य ठरेल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कधी धुवावे हात
शौचालयाचा वापर केल्यावर
जखम स्वच्छ केल्यावर
जेवणापूर्वी आणि जेवणानंतर
बाहेरून आल्यावर
आजारी व्यक्तीला भेटण्यापूर्वी, भेटून आल्यावर
भांडी घासल्यावर
शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घरात येण्यापूर्वी हात-पाय धुण्याची आपली परंपरा आहे. कोरोनाने पुन्हा एकदा त्याची तीव्र आठवण करून दिली आहे. फक्त कोरोना आहे म्हणून सातत्याने हात धुवावे, असे नाही. नियमितपणे अर्धा मिनिटापर्यंत हात स्वच्छ धुवायला हवे. 
- डॉ. संताजी कदम, वैद्यकीय तज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story World Clean Handwashing Day

Tags
टॉपिकस