लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स; पुणे महापालिका आणि बालरोगतज्ज्ञ येणार एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स; पुणे महापालिका आणि बालरोगतज्ज्ञ येणार एकत्र

लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स; पुणे महापालिका आणि बालरोगतज्ज्ञ येणार एकत्र

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांना धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात असताना पुणे महापालिकेने शहरातील बालरोगतज्ज्ञांना एकत्र घेऊन नियोजन करण्यास सुरवात केली आहे. यात महापालिकेचे रुग्णालय अद्ययावत करणे यासह डॉक्टरांची मदत घेऊन टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने यासंदर्भात ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. यात तज्ज्ञ डॉक्टरांची मते जाणून घेण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

बालरोग तज्ञ डॉ. संजय नातू म्हणाले, 'तिसऱ्या लाटेसाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे, सोबतच कुशल वैद्यकीय मनुष्यबळही आवश्यक आहे. शिवाय यासाठी विविध उपकरणे याची उपलब्धता करणे गरजेचे आहे. लहान मुलांच्या बाबतीत लवकर निदान झाले, तर उपचार योग्य दिशेने करणे शक्य आहे. यासाठी आमची संघटना महापालिकेला मदत करणार आहे'.

हेही वाचा: पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस

तिसऱ्या लाटेतपासून लहान मुलांना सुरक्षीत ठेवण्यासाठी विशेष भर देत आहोत. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात अद्ययावत सुविधांचे चाइल्ड कोविड केअर रुग्णालय सुरू करत आहे. दुर्दैवाने लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला, तर आपली पूर्णपणे तयारी असावी. या दृष्टिकोनातून टास्क फोर्स विशेष जबाबदारी भूमिका निभावणार आहे.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

‘‘लहान मुलांना लागण होण्याच्या भीतीने पालकांमध्ये चिंता आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना लागण झाल्यास त्यांच्यावर वेळेवर उपचार करून त्यांना बरे करता येईल. त्यातून मृत्यूदर कमी राहील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये या लहान मुलांच्या उपचाराचा समावेश केला जावा. १८ च्या पूर्वीच्या वयोगटासाठी भारतात मार्च२०२२ पर्यंत तरी लस येणार नाही, त्यामुळे काळजी घ्यावी लागेल.’’

- डॉ. संजय ललवाणी, बालरोगतज्ज्ञ

‘‘तिसऱ्या लाट किती तीव्र असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. पण त्याची तयारी म्हणून ससून रुग्णालयात लहान मुलांसाठी व्यवस्था केले जाईल यामध्ये आयसीयू देखील असेल.’’

- डॉ. आरती किनीकर, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Special Task Force For Children Pune Municipal Corporation And Pediatrician Will Come

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top