esakal | पुणे-पाटणादरम्यान होळीसाठी विशेष गाडी 
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-पाटणादरम्यान होळीसाठी विशेष गाडी 

पुणे-पाटणा मार्गावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य-पूर्व रेल्वेने होळीदरम्यान एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-पाटणादरम्यान होळीसाठी विशेष गाडी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे-पाटणा मार्गावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य-पूर्व रेल्वेने होळीदरम्यान एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

03253 ही गाडी पाटण्याहून 5 आणि 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता पुण्यात पोचेल. तर, पुण्यातून 03254 ही गाडी 6 आणि 13 मार्च रोजी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पाटण्याला पोचेल. या गाडीसाठी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रवासी भाडे असेल. ही गाडी नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरीया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहार, सातना, माणिकपूर, अलाहाबाद, चिचवू, बक्‍सर, अरामार्गे पाटणा येथे पोचेल, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

loading image