वंचित नवीन मतदारांनी नवनवीन करून घ्यावी तहसीलदार मदन जाधव

वंचित नवीन मतदारांनी नवनवीन करून घ्यावी तहसीलदार मदन जाधव
Published on

नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी
२६ अन् २७ सप्टेंबरला मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे

मंगळवेढा, ता. २१ ः मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना नाव नोंदणी करणे, मतदार यादीतील अस्तित्वातील नोंदींमध्ये सुधारणा करणे तसेच यादीतील नाव वगळण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या दावे व हरकतीच्या कालावधीत विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
त्यानुसार मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर २६ अन् २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या दिवशी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संबंधित मतदान केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी, दुरुस्ती अन् नाव वगळणीसाठीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दावे व हरकती सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती अन् नाव वगळणीसाठी अर्ज सादर करता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com