राहाता ः- स्वातंत्र्य सैनिक का.ल.शिंदे स्मृती वक्तृत्व स्पर्धेची बातमी

राहाता ः- स्वातंत्र्य सैनिक का.ल.शिंदे स्मृती वक्तृत्व स्पर्धेची बातमी
Published on

SHD26B05850
राहाता ः स्वातंत्र्य सैनिक का. ल. शिंदे पाटील स्मृती वक्तृत्व स्पर्धेच्या प्रारंभी मार्गदर्शन करताना डाॅ. पी. जी. गुंजाळ. समवेत रमेश शिंदे, डाॅ. नझीर शेख आदी.
---------------------

वक्तृत्व स्पर्धा ग्रामीणसाठी व्यासपीठ
पी. जी. गुंजाळ ः का. ल. शिंदे पाटील स्मृती स्पर्धा
राहाता, ता. २२ ः शालेय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून चांगले वक्ते तयार होतात. स्वातंत्र्य सैनिक का. ल. शिंदे पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या २० वर्षांपासून आयोजित वक्तृत्व स्पर्धा ग्रामीण स्पर्धकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरली, असे प्रतिपादन डाॅ. पी. जी. गुंजाळ यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलात आयोजित स्पर्धेच्या प्रारंभी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सल्लागार समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे, प्राचार्या शीला संसारे, मुख्याध्यापक राजकुमार साळवे, प्राचार्या निशा चेगोट, उपप्राचार्य एस. पी. जगताप, डाॅ. नझीर शेख आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, या स्पर्धेची व्याप्ती वाढत चालली आहे. यंदा १६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणप्रेमी का. ल. शिंदे यांच्या कार्यासह सध्याच्या काळाशी सुसंगत विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले. साहित्यिक डॉ. नजीर शेख, डाॅ. जयंत गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. शरद गमे यांनी प्रास्ताविक केले. सोनाली थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com