आजवरच्या वेगवान कॉम्प्युटिंग तंत्राचा शोध; हजार पटींनी वाढणार संगणकाचा वेग 

microprosseor
microprosseor

पुणे -  आजवरच्या सर्वाधिक वेगवान कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी घेतला आहे. यामुळे संगणकातील मायक्रोप्रोसेसरचा वेग आजपेक्षा हजार पटींनी वाढणार आहे. जर्मनीतील मॅक्‍स प्लॅंक इन्स्टिट्यूटच्या डॉ. ऐन्जल रूबीओ आणि मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) संशोधक विद्यार्थी डॉ. एम. एस. मृदुल यांनी डॉ. गोपाल दीक्षित यांच्या नेतृत्वात हे संशोधन केले. 

संगणक, मोबाईल आदी कॉम्प्युटिंग साधनांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक डिव्हायसेस असतात. सेमिकंडक्‍टर पदार्थांपासून बनलेली ही डिव्हायसेस संदेश किंवा डेटा वहनाचे काम करतात. पदार्थांमध्ये लेझर किरणांच्या साहाय्याने दोष (डिफेक्‍ट्‌स) तयार केल्यास ही वहन क्षमता हजार पटींनी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. जर्मनीतील सुपर कॉम्प्युटरच्या साहाय्याने सिम्युलेशनचे काम पूर्ण करण्यात आले. "एनपीजे कंप्युटेशनल मटेरिअल'या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत हे संशोधन नुकतेच प्रकाशित झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काय आहे संशोधन ? 
- सेमिकंडक्‍टरमधील इलेक्‍ट्रॉन्स आणि होलच्या माध्यमातून माहितीचे वहन होते. 
- संशोधनासाठी द्विमितीय (टू.-डी) बोरॉन नायट्राईडची रचना विचारात. 
- अणूंच्या फिरण्याच्या गतीमध्ये (नेट स्पीन) "वर' (अप) आणि "खाली' (डाउन) असे दोन प्रकार. 
- बोरॉन नायट्राईडची एकूण स्पीन शून्य आहे. 
- संगणकीय सिम्युलेशनच्या साहाय्याने लेझर किरणांच्या प्रकाशात पदार्थाचे अध्ययन. 
- अणूंमधील इलेक्‍ट्रॉनची एकूण स्पीन लेसरच्या प्रकाशात पदार्थामधील डिफेक्‍ट्‌सवर परिणाम करतात. 
- या डिफेक्‍ट्‌समुळे पेटा हर्टझ वेगाने (वारंवारिता) माहितीचे वहन शक्‍य होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संशोधनाचे परिणाम ः 
- मायक्रोप्रोसेसरच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ. 
- महासंगणकाचा कामाचा वेग टेरा हर्टझ इतका आहे. तो तब्बल हजार पटींनी वाढून पेटा हर्टझ इतका होईल. 
- मोबाईलपासून महासंगणकांपर्यंत सर्वांमध्ये आमूलाग्र बदल होईल. 
- डेटा आणि डिजिटल जगासाठी हा क्रांतिकारक बदल ठरेल. 
- खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, हवामानशास्त्र आदी क्षेत्रातील मोठ्या माहितीचे पृत्थक्करण वेगवान पद्धतीने होईल. 

संशोधनासमोरील आव्हाने ः 
- वेगाबरोबरच प्रोसेसरचे तापमान वाढेल, हे तापमान नियंत्रित करणे. 
- प्रत्यक्ष निर्मिती करताना नवीन आव्हाने समोर येतील. 

पदार्थातील वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) नियंत्रित करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनची स्पीन वापरात येत, हे प्रथमच सिद्ध झाले. लेझरच्या साहाय्याने पदार्थामध्ये काळजीपूर्वक डिफेक्‍ट्‌स तयार केल्यास मायक्रोप्रोसेसरचा वेग हजार पटींनी वाढेल. पुढील पाच वर्षात हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात येऊ शकते. 
- डॉ. गोपाल दीक्षित, शास्त्रज्ञ, आयआयटी, मुंबई 

(Edited by : Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com