Pune : विविध उत्पादनांच्या इलेक्ट्रॉनिक तपासणीला येणार वेग

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना त्यांची इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची तपासणी करणे सोपे होणार आहे.
electronic production
electronic productionsakal
Summary

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना त्यांची इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची तपासणी करणे सोपे होणार आहे.

पुणे - कारसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तपासणीला वेग देणाऱ्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशनमधील (एमईसीएफ) अॅनेकोइक चेंबरचे २६ जानेवारीला उद्घाटन होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते हे गुरुवारी दुपारी तीन वाजता उद्घाटन होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबने, एमईसीएफचे अध्यक्ष प्रदिप भार्गव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णा गाडगीळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. भोसरी हे क्लस्टर उभारण्यात आले आहे. कारच्या तपासणीसाठी सध्या केवळ ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियामध्ये (एआरएआय) ही सुविधा उपलब्ध आहे.

आता भोसरीमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना त्यांची इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची तपासणी करणे सोपे होणार आहे. घरगुती उत्पादने, औद्योगिक मशिन, आयटी उपकरणे, ऑटोमोबाईल अॅक्सेसरीज, लायटिंग आणि वैद्यकीय उत्पादने यासारख्या उत्पादन गटांसाठी आवश्यक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नियमांची प्रभावीपणे पूर्तता करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंपॅटिबिलिटी (र्इएमसी) चाचणी करणे अनिवार्य असते. ही चाचणी या सेंटरच्या माध्यमातून करता येर्इल, अशी माहिती भार्गव यांनी दिली.

शहरातील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या डिझाइनपासून प्रमाणपत्रापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प एकूण ६७ कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने ५० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे, तर राज्य सरकारने ६.७ कोटी रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. उर्वरित साडेदहा कोटी रुपये सदस्य उद्योगांनी उभारले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com