मंचर : नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डी. के. वळसे-पाटील
शनिवार, 11 जानेवारी 2020

मंचर-एकलहरे (ता. आंबेगाव) येथे अथर्व गार्डन मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. १०) रात्री झालेल्या 'सकाळ' वर्धापन दिनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवात 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मंचर : मंचर-एकलहरे (ता. आंबेगाव) येथे अथर्व गार्डन मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. १०) रात्री झालेल्या 'सकाळ' वर्धापन दिनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवात 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरच्या गमतीजमती मांडण्यात आल्या होत्या. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ यातील गाण्यासोबतच प्रशांत दामले-कविता मेढेकर या जोडीचा सुपरहिट सवांद, विनोदामुळे सतत हास्याचे फवारे उडत होते. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सत्यशील दादा शेरकर युवा मंच, कोमल प्रोप्रटीज, शरद सहकारी बँक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. व कपासी, संपूर्ण मेन्स वेअर मंचर यांच्या सहकार्याने विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, कपासी, संपूर्ण मेन्स वेअर मंचरचे दीपक हिंगे पाटील यांच्या हस्ते प्रशांत दामले- कविता मेढेकर यांचा सन्मान करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी (ता. ११) रोजी संजय खापरे, पूर्वा फडके व इतर सहकलाकार यांचे डोन्ट वरी हो जायेगा, रविवारी (ता. १२) रोजी संकर्षण कऱ्हाडे व भक्ती देसाई यांचे 'तू म्हणशील तसं' अत्यंत विनोदी ही दोन नाटके होणार आहेत. पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर असलेले एकलहरे (ता. आंबेगाव) येथील अथर्व गार्डन मंगल कार्यालयात नाट्यमहोत्सव सुरु आहे. नाट्य प्रयोगाची प्रवेशिका खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील 'सकाळ' च्या बातमीदारांकडे उपलब्ध आहेत. प्रत्येक दिवसासाठी प्रत्येकी ३०० रुपये असे तिकीट प्रवेश शुल्क आहे.

तिकीट संपर्क-

आंबेगाव तालुका- गार्गी अॅड सेंटर मंचर- 7350000449, सुदाम बिडकर पारगाव- 9975599690, नवनाथ भेके, निरगुडसर- 9503894951, जयदीप हिरवे, पेठ.- 9096276483, विवेक शिंदे, महाळुंगे- 9766587230, चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव -9011017849, अरुण सरवदे, शिनोली- 9922821821, 
खेड तालुका- विलास काटे, आळंदी -8788477057, हरिदास कड, चाकण- 9881907169, राजेंद्र सांडभोर, राजगुरुनगर- 9766119999, रुपेश बुट्टे, अंबेठान- 9850070174, राजेंद्र लोथे, चास -7588626288, गणेश फलके, कुरुळी- 8379926514, महेंद्र शिंदे, कडूस- 9922419249, सदा अमराळे, दावडी- 9226715533, 
जुन्नर तालुका-
रवींद्र पाटे, नारायणगाव- 9922913286, दत्ता म्हसकर जुन्नर- 9011017852, मिनानाथ पानसरे, आपटाळे- 9096328377, पराग जगताप, ओतूर- 9561163000, अमोल थोरवे, शिरोली- 9552556271, अर्जुन शिंदे, आळेफाटा- 9975156456, सिद्धार्थ कसबे, पिंपळवंडी- 7757891409. 
अधिक माहितीसाठी संपर्क- जाहिरात व्यवस्थापक- संतोष पोटे- 9881718817, डी. के. वळसे पाटील- 9822076699.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The spontaneous response of the the drama