
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षाकरिता करार पद्धतीने १३३ सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले होते. उमेदवारांच्या मुलाखतींमधून गुणवत्ता आणि निवड यादी तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे एकूण १३३ पदांपैकी ८६ पदांवर निवड झालेल्या उमेदवारांची यादी विद्यापीठाने जाहीर केली आहे.