
Pune University
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांचे विद्याविषयक, संशोधन आणि विकासविषयक अन्य कार्यक्रम समाविष्ट असलेला वार्षिक अहवाल दरवर्षी तयार करण्यात येतो. त्यासंबंधी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांकडून माहिती मागविली जाते. परंतु, सातत्याने मुदतवाढ देऊनही काही महाविद्यालयांनी माहिती न पाठविल्याने पुन्हा १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे.