

SPPU Gives Special Chance to 96,000 Students
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुदत संपल्याने शिक्षण अर्धवट राहिलेल्या जवळपास ९६ हजार विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा देण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. या विद्यार्थ्यांचा ‘पीआरएन’ (कायम नोंदणी क्रमांक) पुन्हा खुला होणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमाची परीक्षा पुन्हा एकदा देण्याची विशेष संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.