
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या ‘क्यूएस रॅंकिंग’मध्ये ५६६ व्या स्थानावर मजल मारली आहे. भारतातील शिक्षण संस्था आणि विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठ १४ व्या क्रमांकावर आहे, तर देशातील सार्वजनिक विद्यापीठांच्या क्रमावारीत विद्यापीठ दुसऱ्या स्थानावर आहे. ‘क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी’ हे उच्च शिक्षणातील जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचे रॅंकिंग मानले जाते. या वर्षी जागतिक क्युएस मानांकन २०२६ क्रमवारीत १०६ देशांतील आठ हजार ४६७ शैक्षणिक संस्थांची तपासणी करण्यात आली. यात दीड हजाराहून अधिक संस्थांना अंतिम क्रमवारीत स्थान मिळाले.