Pune University : शिष्यवृत्ती अर्जांची तत्काळ पडताळणी करा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आदेश; १० हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Over 10,000 Scholarship Applications Pending at Pune Colleges : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये 'महाडीबीटी पोर्टल'वरील विद्यार्थ्यांचे दहा हजारांहून अधिक शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहिल्याने, विद्यापीठाने महाविद्यालयांना हे अर्ज तातडीने मंजूर करून पडताळणी प्रलंबित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे कडक आदेश दिले आहेत.
Over 10,000 Scholarship Applications Pending at Pune Colleges

Over 10,000 Scholarship Applications Pending at Pune Colleges

Sakal

Updated on

पुणे : विद्यार्थ्यांचे विविध शिष्यवृत्तींचे जवळपास दहा हजारांहून अधिक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेकरिता विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी महाविद्यालय स्तरावरून तातडीने करावी. महाविद्यालय स्तरावरील अर्ज प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असा आदेश विद्यापीठाने दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com