
पुणे : रशियन भाषा शिकण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांच्या जिद्दीला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे यश मिळाले आहे. परदेशी भाषा विभागातून रशियन भाषा शिकणाऱ्या १३ विद्यार्थ्यांची रशियातील ‘रशियन पीपल्स फ्रेंडशिप युनिर्व्हसिटी’मध्ये (मॉस्को) होणाऱ्या समर स्कूलसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी रशियन शिकता शिकता १५ दिवसांच्या भाषा अभ्यासासाठी थेट ‘मॉस्को’ गाठले आहे.