

SPPU Press Celebrates Platinum Jubilee
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अलीकडेच अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले आहे. आता त्यानंतर विद्यापीठाचे मुद्रणालय गुरुवारी (ता. १३) अमृतमहोत्सव साजरा करत आहे. येत्या काळात मुद्रणालयातर्फे छपाईतील नव्या घडामोडींशी सुसंगत अशी आधुनिक छपाई यंत्रणा (प्रिंट) खरेदी करणार आहे. सध्या पारंपरिक छपाई केली जाते. यापुढे आधुनिक छपाईची सेवा पुरविली जाणार आहे.