SSC Paper Leak : पुण्यातही पेपरफुटी; महिला सुरक्षारक्षकाच्या फोनमध्ये सापडला गणिताचा पेपर | sSc Exam Paper leak in pune Board Exam Photo found in lady bouncers phone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buldhana Paper Leak
SSC Paper Leak : पुण्यातही पेपरफुटी; महिला सुरक्षारक्षकाच्या फोनमध्ये सापडला गणिताचा पेपर

SSC Paper Leak : पुण्यातही पेपरफुटी; महिला सुरक्षारक्षकाच्या फोनमध्ये सापडला गणिताचा पेपर

पुण्यात दहावीच्या गणित भाग एकचा पेपर महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. बारावीचा पेपर फुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच हा प्रकार उघडकीस आला आहे. या महिला सुरक्षारक्षकावर आता गुन्हा दाखल झाला आहे.

दहावीच्या परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो काढल्याने या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे.

१३ मार्चला गणित भाग एकचा पेपर होता यावेळी विद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. १५ मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर पथकाला संशय आला.

यावेळी तिच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असता गणित भाग एक प्रश्न पत्रिकेचे फोटो काढल्याचे समोर आले. यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली. पण तिने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे अखेर पथकाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

टॅग्स :sscSSC Exam