शिरूर - दहावीच्या परीक्षेत शिरूर तालुक्यात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तूलनेत निकालाचा टक्का घसरला असला तरी शंभर नंबरी यश मिळविणाऱ्या शाळांची संख्या वाढली आहे.
दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यात शिरूर तालुक्याचा सरासरी निकाल ९७.२९ लागला असून, गतवर्षीच्या तूलनेत दीड टक्क्याने निकाल घसरला आहे. गतवर्षी ३४ शाळांचा निकाल शंभर टक्के होता. यावेळी ३७ शाळांनी शंभर टक्के यश मिळविले आहे.