लोणी देवकर - दहावीच्या परीक्षेचे पेपर सुरू असताना आयुष्यात सर्वस्व असलेल्या आईचे निधन झाले. कशातही मोजता न येणारे दुःख सोबत घेत तिने दहावीची परीक्षा दिली. दुःखाचा हा डोंगर पार करत तिने ९०.२० टक्के गुण प्राप्त केले. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील निकिता पांडुरंग शिंदे हिच्या या दुःखातून सावरत मिळवलेल्या यशाचे कौतुक होत आहे.