दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी 17 नंबर फॉर्म भरणाऱ्यांना 2 नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार

ssc hsc exam 17 no form registration
ssc hsc exam 17 no form registration
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७ भरून प्रविष्ट होणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी अर्ज करता येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये लागल्याने खासगी विद्यार्थी ऑनलाइन नाव नोंदणीसाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या दाखल्यावरील शाळा, महाविद्यालय सोडल्याची तारीख ग्राह्य धरावी. खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाने सांगतिले आहे.

इन्फोबॉक्स :
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :
- दहावी : http://form17.mh-ssc.ac.in
- बारावी : http://form17.mh-hsc.ac.in

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना :
- कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर किंवा मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत.
- विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.
- अर्ज भरल्यावर त्याची प्रत विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे.
- नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे राज्य मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com