

Even with Fewer Students, State Board Delays SSC Results Announcement
sakal
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीचा निकाल बुधवारी जाहीर केल्यानंतर आता राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांचे लक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाकडे लागले आहे. राज्य मंडळापेक्षा विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट असतानाहीदेखील अवघ्या ३५ दिवसांत ‘सीबीएसई’ला दहावीचा निकाल लावणे शक्य झाले. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या निकाल प्रक्रियेतील विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.