
अविनाश ढगे
पिंपरी : नवदांपत्याचा आठ दिवसांपूर्वी थाटामाटात विवाह झाला. त्यांनी महाबळेश्वरला फिरायला जायचे ठरवले. त्यासाठी एसटीचे ऑनलाइन तिकीट आरक्षित केले. प्रवासाचा दिवस उजाडला. नवदांपत्य महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुण्यातील स्वारगेट आगारात पोचले.