beating
sakal
पुणे
Manchar Crime : एसटी चालकासह प्रवाशास मारहाण; खेड घाटातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचालक व बसमधील एका प्रवाशास दुचाकीवरील दोन अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली.
मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात (ता. खेड) परळ ते साकोरी या एसटी बसचालक भरत पांडुरंग बुगदे व बसमधील एका प्रवाशास दुचाकीवरील दोन अज्ञात तरुणांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी( ता.४) संध्याकाळी घडली आहे.
