एसटीच्या अफवेला बळी पडू नका; महामंडळानं केला खुलासा!

 ST bus transport Only within the district is allowed
ST bus transport Only within the district is allowed

पुणे : एसटी महामंडळाच्या बसची फक्त जिल्हातंर्गत वाहतूक सुरू आहे. आंतरजिल्हा वाहतूक बंदच आहे, असे महामंडळाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.  त्यामुळे पुणे- कोल्हापूर अथवा सोलापूर मार्गावर बस वाहतूक सुरू झाल्याच्या अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे- कोल्हापूर, सोलापूर आदी मार्गांवर विशेष बाब म्हणून एसटीची बस वाहतूक सुरू झाली आहे, असे मेसेज सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. त्याचा खुलासा करताना, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी म्हणाल्या, राज्य सरकारने आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिलेली नाही. त्यानुसार सध्या फक्त पुणे जिल्ह्यात एसटीची बस वाहतूक सुरू आहे. त्यात बारामती, दौंड, इंदापूर, भिगवन, जुन्नर, नारायणगाव, खेड, शिरूर, तळेगाव आदी ठिकाणी एसटी बसची वाहतूक सुरू आहे. मात्र, पुण्यातील स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवडमधील एसटी स्थानक येथून वाहतूक बंद आहे. दोन्ही महापालिकांमधून अद्याप एसटी वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. भोरमध्येही एसटी वाहतूक सुरू करता आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुण्यामध्ये आजपासून नवीन नियम लागू... 

शहर अथवा जिल्ह्यातील ज्या भागात कोरोनाच्या रुग्णांचा उद्रेक झाला आहे, तेथील वाहतूक बंद ठेवावी, असेराज्य सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. त्याचे पालन करून एसटी वाहतूक सुरू आहे. तसेच ज्या भागात एसटीची बस वाहतूक सुरू आहे, तेथे बसच्या क्षमतेच्या निम्मेच प्रवासी घेतले जात आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून ही वाहतूक करण्यात येत आहे. प्रवाशांसाठी वापरण्यात येणाऱया बसचे दररोज दोन किंवा तीन फेऱयांनंतर निर्जुतुकीकरण करण्यात येत असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या गरजेनुसार तालुक्यांच्या ठिकाणच्या बसच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

कोरोनामुळे 78 टक्के लघू, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद 

एसटी महामंडळाच्या बसमधून मालवाहतूक सुरू आहे. त्यासाठी आंतरजिल्हाही बस जात आहेत. पुण्यातून ठाणे, मुंबई तसेच अन्य शहरांमध्ये मालवाहतूक सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी बसमधून पहिल्यांदाच माल वाहतूक होत आहे. एका बसमधून एका वेळी कमाल आठ टनांपर्यंत माल वाहतूक होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 जिल्ह्यात हरघर गोठे, घरघर गोठे...
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com