esakal | लालपरी फिरविणारे देतायेत गवंड्यांच्या हातात विटा   
sakal

बोलून बातमी शोधा

ST

कोरोनाचा मुकाबला करताना अनेकांवर आर्थिक संकट जसे कोसळले आहे, तसेच संकट एसटीच्या चालक व वाहकांवरही कोसळले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पगाराचा पत्ताच नसल्याने काही चालक वाहकांनी इतर काम शोधण्यास प्रारंभ केला आहे. 

लालपरी फिरविणारे देतायेत गवंड्यांच्या हातात विटा   

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाचा मुकाबला करताना अनेकांवर आर्थिक संकट जसे कोसळले आहे, तसेच संकट एसटीच्या चालक व वाहकांवरही कोसळले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पगाराचा पत्ताच नसल्याने काही चालक वाहकांनी इतर काम शोधण्यास प्रारंभ केला आहे. 

पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल
 
पतसंस्था, एसटी बँक, सोसायटी यांची काढून ठेवलेली कर्जे व आता हप्ते कसे फेडायचे आणि घर कस चालवायच, याची चिंता या कामगारांना लागून राहिली आहे. मे महिन्याचा थोडासा पगार जमा झाला, जूनचा मिळाला नाही. आता जुलैही संपत आला, पण पैसेच नाहीत. घर चालवायचे म्हणून काही जणांनी गवंड्यांच्या हाताखाली काम सुरु केले आहे, काही जण मंडईत भाजीविक्री करु लागले आहेत, काही जण शेतात शेतमजूर म्हणून कामाला रोजंदारीवर जाऊ लागले आहेत. एकाने तर आज नागपंचमीचे साहित्य विक्री केले. काही जण सेंटरिंगचे काम करण्यासाठी जात आहेत, तर काही जणांनी खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरी मिळते का ,याचा प्रयत्न सुरु केलाय. 

सावधान, वापरलेले मास्क रस्त्यावर टाकताय

सोसायटी, पतसंस्था, बँकेचे हप्ते पगारच नसल्याने कोठून भरायचे, या चिंतेने ग्रस्त कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात का होईना, हाताला काहीतरी काम मिळायला हवे, याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुसतं घरात बसून तरी काय करणार, काम केल तर चार पैसे मिळतील, या उद्देशाने ही कामे चालक- वाहकांकडून स्विकारली जात आहेत. सर्वांनीच असा निर्णय घेतलेला नसला, तरी अनेकांनी आता काम शोधायला प्रारंभ केला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, बारामती एसटी स्थानकावरून 22 मार्चपासून बस सुटल्या नाहीत. मध्यंतरी लॉकडाउन संपल्यानंतर हडपसर, नीरा, भिगवण व वालचंदनगरच्या बस सुरु झाल्या होत्या, मात्र प्रवासीच नसल्याने शेवटी या गाड्याही बंद करण्याची वेळ आली.

स्वेच्छानिवृत्तीची सक्ती नको...
एसटीने 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना जाहिर केली आहे, याची सक्ती व्हायला नको. जे स्वेच्छानिवृत्ती घेतील, त्यांना उर्वरित सेवेच्या किमान निम्मे वेतन मिळावे, वारसाला नोकरी द्यावी, ही अपेक्षा  महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या बारामती शाखेचे अध्यक्ष प्रकाश काळभोर व सचिव राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली.