एसटीच्या चालक-वाहकांना ‘इकडे आड, तिकडे विहीर’

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

कुठलेही काम न करता, सरकारने गेले तीन महिने सर्व कर्मचाऱ्यांना पगार दिले, विमाकवचही दिले. मग जेव्हा सरकारला गरज असेल; तेव्हा सेवा बजावणे हे कामगारांचे कर्तव्य आहे.

शिरूर -  एसटीच्या चालक-वाहकांना मुंबईच्या दिमतीला पाठविण्याचा फतवा निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मुंबईतील ‘धोक्‍या’ची ड्यूटी नाकारणाऱ्यांना बडतर्फीचे इशारे देण्यात आल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी कर्मचाऱ्यांची अवस्था झाली आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मुंबईतील ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मुंबईतील प्रवासी वाहतुकीचे आदेश देण्यात आले आहेत. शिरूरसह, जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर तसेच काही आगारातील कर्मचाऱ्यांनी मुंबईतील प्रवासी सेवेला विरोध दर्शवला असून, सुरक्षिततेची लेखी हमी मिळाल्याशिवाय ही सेवा देण्यास असमर्थता दर्शवली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कुठलेही काम न करता, सरकारने गेले तीन महिने सर्व कर्मचाऱ्यांना पगार दिले, विमाकवचही दिले. मग जेव्हा सरकारला गरज असेल; तेव्हा सेवा बजावणे हे कामगारांचे कर्तव्य आहे. अवाजवी मागण्या करून, चालढकल केल्यास आपत्कालीन कायद्याचा भंग केला म्हणून कठोर कारवाई होऊ शकते. १५ दिवसांची ड्यूटी आठवड्याची करता येऊ शकते; पण कामाला नकारच द्यायचा हे चुकीचे आहे. 
- महेंद्र माघाडे,  एसटी आगार व्यवस्थापक, शिरूर

या आहेत कामगारांच्या मागण्या
१५ दिवसांचा कालावधी आठ दिवसांचा करावा
दहा हजार रुपये उचल मिळावी 
निवास व भोजन व्यवस्थेबाबत लेखी हमी मिळावी
प्रवासादरम्यान, सुरक्षिततेसाठी कोरोना किट मिळावे
आपत्कालीन स्थिती व प्रकृती बिघडल्यास पुन्हा परतण्याची मुभा द्यावी 
सेवा बजावून आल्यानंतर १५ दिवस दुसरी ड्यूटी लावू नये 
परतल्यानंतर कोरोना चाचणी सरकारी खर्चातून करावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST driver-conductor at Shirur Depot