esakal | बारामती : 'लालपरी'ला अच्छे दिन; दिवाळीमुळे सोडाव्या लागल्या जादा गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

ST_Bus

बारामती आगारातून सध्या जवळपास 60 गाड्या सोडल्या जात असून त्यांच मध्यम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही समावेश आहे. काल दिवाळीमुळे स्वारगेट, औरंगाबाद, शिर्डी येथे जादा गाड्या सोडण्यात आल्या. या मार्गावर प्रवाशांची वर्दळ चांगली होती. 

बारामती : 'लालपरी'ला अच्छे दिन; दिवाळीमुळे सोडाव्या लागल्या जादा गाड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : कोरोनाच्या संकटातून लाल परीही आता बाहेर पडू लागली असून बारामतीतील एसटीचे चक्र आता रुळावर येऊ लागले आहे. यंदा दिवाळीत गतवर्षीइतका नसला तरी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला असून शुक्रवारी (ता.१४) लॉकडाऊननंतर पहिल्यांदाचा एसटीला जादा गाड्या सोडाव्या लागल्या. 

पुणे विभागातील एक मोठे आगार म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. लॉकडाऊनच्या काळात एसटी ठप्प झाली होती, सगळीकडेच व्यवहार बंद असल्याने एसटीच्या कामकाजावरही त्याचा विपरीत परिणाम झाला होता. आता मात्र एसटीचे व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. 

कोरोना लस तयार होतेय; पण ठेवणार कुठं? युरोपमध्ये होतायत भलीमोठी कोल्ड स्टोअरेज​

बारामती आगारातून सध्या जवळपास 60 गाड्या सोडल्या जात असून त्यांच मध्यम आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही समावेश आहे. काल दिवाळीमुळे स्वारगेट, औरंगाबाद, शिर्डी येथे जादा गाड्या सोडण्यात आल्या. या मार्गावर प्रवाशांची वर्दळ चांगली होती. 

बारामतीहून पुण्याला सर्वाधिक गाड्या सोडल्या जातात. सध्या बारामती पुणे मार्गावर साधारणपणे 45 फे-या होत असून तितक्याच फे-या पुणे बारामती मार्गावरही होत आहेत. एसटीचे प्रवासी वाढू लागल्याने एसटी कर्मचा-यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त बारामती बसस्थानकावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून कर्मचारी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून समाधानी होऊ लागले आहेत. 

यंदा फटाक्‍यांचा आव्वाज कमीच; खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह कमी​

पुणे विभागाचा कारभार सुरळीत...
एसटीच्या पुणे विभागातील 13 आगारातील 812 गाड्यांच्या माध्यमातून राज्यभर प्रवाशांची वाहतूक सुरु झाली आहे. सर्वच आगारांनी आपापल्या शंभर टक्के मार्गावर गाड्या सुरु केल्या आहेत. पूर्वीच्या तुलनेत प्रवासी संख्या कमी असली तरी आता हळुहळू प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे.
- रमाकांत गायकवाड, पुणे विभाग नियंत्रक, पुणे. 

सर्व मार्गावर सेवा सुरु...
बारामती आगारातून कमी, मध्यम व लांब पल्ल्याच्या सर्वच मार्गावरील वाहतूक सुरु झाली असून एका गाडीतून सरासरी तीसपर्यंत प्रवासी सध्या प्रवास करीत आहेत. हळुहळू प्रतिसाद वाढत आहे. आम्ही प्रसंगी जादा गाड्याही सोडत आहोत. दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतो आहोत.
- अमोल गोंजारी, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, बारामती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)