पिंपरीच्या 'स्थायी' सभेत गोंधळ; सदस्यांचा एकेरी उल्लेख, दमदाटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेतील विषयांवर चर्चा न करताच ते मंजूर करण्यावर सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. याला पाठिंबा दर्शवीत "राष्ट्रवादी'चे नगरसेवक मयूर कलाटे यांनीही विषय उचलून धरला. यातूनच सभापती विलास मडिगेरी व कलाटे बंधू यांच्यात वाद रंगला. त्यातच एकेरी उल्लेख केल्याच्या कारणावरून राहुल कलाटे यांनी मडिगेरी यांना दम भरला. अखेर फुगेवाडी दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.

पिंपरी - स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेतील विषयांवर चर्चा न करताच ते मंजूर करण्यावर सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. याला पाठिंबा दर्शवीत "राष्ट्रवादी'चे नगरसेवक मयूर कलाटे यांनीही विषय उचलून धरला. यातूनच सभापती विलास मडिगेरी व कलाटे बंधू यांच्यात वाद रंगला. त्यातच एकेरी उल्लेख केल्याच्या कारणावरून राहुल कलाटे यांनी मडिगेरी यांना दम भरला. अखेर फुगेवाडी दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्याने विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र या बैठकीत दिसले. आजच्या मंजुरीसाठी विविध विषय मांडले जाणार होते. मात्र, सभेच्या सुरुवातीपासून राहुल कलाटे यांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रत्येक विषय सभेत येण्यापूर्वी त्यावर चर्चा करा, बहुमताच्या जोरावर मंजूर करू नका, असे ते सांगत होते. त्यावर मडिगेरी यांनी "मी माझ्या पद्धतीनेच कामकाज करणार' असे उत्तर दिल्याने वादाची ठिणगी पडली. पत्रिकेवरील सर्व विषय सदस्यांना कळाले पाहिजेत. त्याचे जाहीर वाचन करून त्यावर चर्चा झाल्यावरच मंजुरी मिळाली पाहिजे. सभापतींच्या म्हणण्यानुसार कामकाज चालणार नाही, असे कलाटे यांनी सांगितले. त्यावर मडिगेरी यांनी नियमावली वाचून दाखवली. 

संभाजी भिंडेना सहानुभूतीचा प्रश्नच नाही; जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण 

या वेळी चर्चा न करता विषय मंजुरी घेतल्यावर कलाटे म्हणाले, 'सभा पारंपरिक पद्धतीने की कायद्याप्रमाणे घ्यायची हे पहिले ठरवा.' त्यावर मयूर कलाटे यांनी सभा तहकूब करण्याची सूचना केली. मात्र, भाजपचे शीतल शिंदे म्हणाले, 'सदस्यांना विश्‍वासात घेऊन चर्चा केल्यावर विषय मंजूर करण्यास सांगत वादग्रस्त विषय दालनात घेऊ. चव्हाट्यावर काढू नका.' त्यामुळे मडिगेरी यांना कोणतेच विषय मंजूर करता आले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: standing committee meeting suspended in pimpri chinchwad corporation