'तळेगाव ढमढेरे परिसरात कोविड सेंटर सुरू करा'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी परिसरात औद्योगिकरणाचा विस्तार झाल्याने कामगारांची संख्या मोठी आहे.

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर व सणसवाडी येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांना तातडीची आरोग्य सुविधा मिळण्यासाठी कोविड सेंटरची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व माजी सरपंच अनिल भुजबळ यांच्यासह ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार अमोल कोल्हे यांनाही दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी परिसरात औद्योगिकरणाचा विस्तार झाल्याने कामगारांची संख्या मोठी आहे. कामगारांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे परिसरात कोरोना ससर्गाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा मिळण्यासाठी हक्काचे कोविड सेंटर असणे गरजेचे आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, कारखानदारांना आपण सांगितले, तर कोविड सेंटर परिसरात सुरू होऊ शकतात. त्यासाठी जॉन डिअर कंपनी मदत करू शकते. परंतु, आपण सांगितले तर मदत होऊ शकेल, असे भुजबळ यांनी निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: start covid center in talegaon dhamdhere area