
पुणे-दौंड लोहमार्गावर दौंड, बारामती, हवेली, श्रीगोंदा या चार तालुक्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी विद्युत लोकलसेवा सुरू करावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
केडगाव - पुणे-दौंड लोहमार्गावर दौंड, बारामती, हवेली, श्रीगोंदा या चार तालुक्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी विद्युत लोकलसेवा सुरू करावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आमदार कुल यांनी दौंड तालुक्यातील रेल्वेशी संबंधित विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली. याबाबत त्यांनी सांगितले की, रेल्वेची सेवा विस्तारण्याच्या व प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या दौंड- पुणे लोहमार्ग विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन ४ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यामुळे दौंड- पुणे मार्गावर तातडीने विद्युत लोकल चालू करावी. या मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लोकलच्या १२ फेऱ्याची गरज आहे.
रोगानं नाही डॉक्टरनंच केला घात; कॅन्सरच्या नावाखाली उकळले दीड कोटी!
दौंड रेल्वे कॉर्ड लाइन स्टेशन पूर्णपणे विकसित होईपर्यंत दौंड- नगर मार्गावरील सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांना दौंड स्टेशनवर थांबा द्या. दौंड तालुक्यातील आठ रस्त्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरील नांदूर- सहजपूर रस्ता, खामगाव- कासुर्डी रस्ता, भांडगाव- खुटबाव रस्ता, बोरीपार्धी- नानगाव रस्ता, वरवंड- कडेठाण रस्ता आदी मार्गांवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Edited By - Prashant Patil