वडगाव शेरी - मागील काही वर्षांपासून पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. यावर ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याने वाघोली-शिरूर दरम्यान मंजूर झालेल्या उड्डाण पुलाचे काम त्वरित सुरू करावे', अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.