राज्यांची स्टार्टअप क्रमवारीची यादी सोमवारी होणार प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

startup ecosystem startup ranking list of the states will released on Monday

राज्यांची स्टार्टअप क्रमवारीची यादी सोमवारी होणार प्रसिद्ध

पुणे : स्टार्टअप इकोसिस्टमला पाठबळ देण्यासाठी राज्यातील स्टार्टअपच्या क्रमवारीची तिसरी आवृत्ती सोमवारी (ता.४) प्रसिद्ध केली जाणार आहे. क्रमवारीत निवड झालेल्या स्टार्टअपला देशातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांत सहभागी करून घेतले जाणार आहे. नवी दिल्लीत एका समारंभात वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल हा यादी जाहीर करतील. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील स्टार्टअपला बूस्टर देण्यासाठी आणि स्टार्टअप इकोसिस्टमला समर्थन देवून ते आणखी मजबूत करण्यासाठी २०१८ पासून केंद्र सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) अंतर्गत या क्रमवारीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी एकूण २४ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांनी यात सहभाग घेतला आहे.

देशातील टियर टू आणि टिअर थ्री शहरांमध्ये उद्योजकतेची वाढ होत आहे. स्टार्टअप धोरणे असलेले २०१६ साली केवळ चार राज्ये/केंद्रशासित प्रदेश होते. मात्र सध्या देशातील ३० पेक्षा जास्त राज्ये/केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्यांच्याकडे स्टार्टअप धोरणे आहेत. तसेच २७ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे स्वतःचे स्टार्टअप पोर्टल आहे, असे विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद आहे. यंदाच्या स्टार्टअप क्रमवारीत स्टार्टअपला सात मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक साहाय्य, नवोपक्रम आणि उद्योजकता वाढवणे, बाजारपेठांची उपलब्धता करून देणे, इनक्युबेशन समर्थन, निधी समर्थन, मेंटॉरशिप सपोर्ट आणि सक्षमकर्त्यांची क्षमता वाढवणे यांचा समावेश होतो.

Web Title: Startup Ecosystem Startup Ranking List Of The States Will Released On Monday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..