छोट्या शहरांतही स्टार्टअपला ‘अच्छे दिन’

नवकल्पनेला वाव देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी उपलब्ध होत असल्याने देशातील बड्या शहरांमध्ये स्टार्टअपची संख्या वाढत आहे.
Startup Policy News
Startup Policy Newssakal
Summary

नवकल्पनेला वाव देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी उपलब्ध होत असल्याने देशातील बड्या शहरांमध्ये स्टार्टअपची संख्या वाढत आहे.

पुणे - नवकल्पनेला वाव देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी उपलब्ध होत असल्याने देशातील बड्या शहरांमध्ये स्टार्टअपची संख्या वाढत आहे. मात्र, स्टार्टअप वाढीची ही संख्या आता केवळ बड्या शहरांपुरती मर्यादित राहिली नसून छोट्या शहरांमध्येही नवकल्पनांना मूर्त रूप येत आहे. स्टार्टअपसाठी चांगले वातावरण असलेल्या जगातील १०० ते एक हजारच्या श्रेणीत भारतातील ३२ शहरे आहेत. यातील काही शहरे ही टिअर टू व थ्री स्वरूपाची आहेत.

जागतिक स्टार्टअप परिसंस्था (इकोसिस्टीम) निर्देशांकामध्ये आशिया खंडात भारताचा चौथा क्रमांक आहे. जागतिक स्तराचा विचार केला असता देशातील तीन शहरे पहिल्या वीसमध्ये आहेत. इस्राईलमधील ‘स्टार्टअप ब्लिंक’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक स्टार्टअप परिसंस्था निर्देशांक २०२२ मध्ये यासंबंधीची माहिती नमूद आहे. देशातील टिअर टू शहरांमधील स्टार्टअपची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. भारतीय उद्योजकांमध्ये मोठी प्रतिभा आहे. अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडॉब या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय आहेत. त्यांच्यातून भारतीय उद्योजकांची प्रतिभा दिसते, असे अहवालात नमूद आहे.

अत्यंत चांगली नवकल्पना आहे, पण स्टार्टअप सुरू करण्यासाठी भांडवलाची कमतरता असल्याचे अनेक तरुण व्यावसायिक देशात आहे.

स्टार्टअप वाढण्याची कारणे

  • डिजिटल ॲक्सेस मिळाला

  • मोबार्इल वापराचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले

  • इंटरनेटचा वापर वाढला

  • इंटरनेट स्वस्त असून ते सर्वांसाठी उपलब्ध झाले

  • सॉफ्टवेअर ओपन सोर्स झाले

  • क्लाऊड स्टोरेजसाठी जास्त खर्च येत नाही

  • सरकारने स्टार्टअपपूरक धोरणे आखली आहेत

  • डिजिटल टेक्नॉलॉजी सर्वांना उपलब्ध आहे

  • सर्वसमावेशकता वाढली आहे

देशातील एकूण युनिकॉर्नपैकी ५० टक्के स्टार्टअप हे टिअर टू आणि टिअर थ्री शहरांमधील आहेत. सरकारदेखील स्टार्टअपला चालना देत आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी आणि सर्वसमावेशकता वाढत चालल्याने देशातील सर्वच भागातून स्टार्टअप समोर येत आहेत.

- डॉ. रघुनाथ माशेलकर, सह-अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com